(Rada)
लेखक : भाऊ पाध्ये
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
बापजाद्यांचं खानदान त्याचा उद्योगधंदा, चनदौलत या सगळ्यावर लाथ मारून बेबंदपणे चालणारा एक मनस्वी तरुण आपसूक रस्त्यावर येतो. आख्ख गाव डोक्यावर घेतो. दारूच्या गुत्त्यात घुमाकूळ करता शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला आवाज देतो.
बापाला बाप न मानणाऱ्या अशा तरुणांच पुढे काय होत? ते भाऊ पाध्याच्या नजरतूनच पाहायला हवं.
"राडा चं मुख्य केंद्र तरुणांची सृजनशीलता या महानगरी वातावरणात कशी आपोआप विकृत स्वरूप धारण करते हे आहे. कुठेतरी आपल्या मूलभूत सौदर्यकल्पना छाटल्या जातात. मूल्याची आपोआप खच्ची होते. मूळ स्वातंत्र्यशील असलेल्या आडदांड व्यक्तिमत्त्वाला हाकलत ढकलत एका पूर्वनियोजित पिंजऱ्यात कोडलं जातं आणि त्यात मिळेलत्या जागेवर हा पशू खोट्या ऐटीत येरझाऱ्या घालत राहतो." असं भालचंद्र नेमाड्यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनत म्हटलया
१९७५ साली अलिबागमधून प्रकाशित झालेली ही कादंबरी वाचकांपुढे येण्यापूर्वीच शिवसेनेने तिची गळचेपी केली. हा सगळा प्रकार भाऊ पाध्यांनी एका लेखात नोटवून ठेवला आहे - "असं समजलं की प्रकाशकाला शिवसेनेच्या मंडळीकडून दम बसला होता आणि त्यामुळे त्याने राडा च्या प्रती बाजारात विकायला काढल्या नाहीत. हीपण एक सेन्सॉरशीपच आहे. अर्थात माझ्यासाठी कोण आवाज उठवणार म्हणा."
(out of stock)
MRP ₹220 ₹195 (25₹ Discount)