कादंबरी

रुद्र

(Rudra)

लेखक : विलास सारंग

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

एन्कीच्या राज्यात या कादंबरीनंतर खूप वर्षांनी विलास सारंगांची रुद्र ही नवी कादंबरी मराठीत प्रकाशित होते आहे.

आधुनिक जीवनाचे संदर्भ शाबूत ठेवत रुद्र संस्कृतीच्या इतिहासाच्या गाभ्यात, मिथ्यकथांच्या घनदाट प्रदेशात शिरली आहे. मिथ्यकचा आणि आधुनिकता यांना परस्परांच्या संदर्भात सक्रिय करत सारंगानी एक लोकविलक्षण विश्व रुद्रमधून निर्माण केले आहे.

रुद्रमधल्या या लोकविलक्षण विश्वाच्या उभारणीतून निर्मिती आणि विध्वंस हे मानवी संस्कृतीतील चिरंतन द्वंद्व साकार होते. या द्वंद्वाच्या कक्षेत जन्म, मृत्यू. समाजव्यवस्था, लैंगिकता, नातेसंबंध, हिंसा, प्रेम, द्वेष यांसंबंधीच्या विविध अनुभवांना समाविष्ट करत संस्कृतीमधील त्याच्या स्थानांचा मूलगामी शोघ स्ट्रमधून घेतला जातो. सूक्ष्म विश्लेषण आणि तीक्ष्ण अर्थनिर्णयन या सारंगांमधील क्षमता येथे कसाला लागलेल्या आहेत.

पौराणिक कथनपद्धतीचा जाणीवपूर्वक केलेला उपयोग, कादंबरीच्या प्रचलित संकेतव्यूहाचा अभिनव रीतीने केलेला वापर आणि उपहास उपरोधाचा स्पर्श झालेली विनोदबुद्धी या विशेषांमुळे रुद्रला वाचनीयतेचे परिमाणही प्राप्त झाले आहे.

पारंपरिक मिथ्यकथांचा आर्ष उघडेपणा आणि आधुनिक कथनामधील मूलभूत संदिग्धता या दोहोंना एकाच वेळी कवेत घेणारी रुद्र मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी ठरावी.

- डॉ. हरिश्चंद्र थोरात


(out of stock)

MRP ₹200 ₹180 (10% Discount)