
(Saatmaykatha)
लेखक : हृषीकेश पाळंदे
प्रकाशन : पपायरस प्रकाशन
पिढ्यानपिढ्या झिरपत आलेल्या आख्यानांतून, कथा-कहाण्यांतून सातमायकथा आकारत जाते. गोष्टींना गोष्टींचे धुमारे फुटतात. कथांमधून कथा उगवत राहतात. या कथांच्या बहुपेडी गोफातून हृषीकेश पाळंदे यांनी 'सातमायकथे'चं महाआख्यान विणलं आहे. या कादंबरीची मुळं पारंपरिक कथनाच्या भूमीत खोलवर शिरून पोषक द्रव्य शोषून घेतात. ही कादंबरी गोष्ट सांगणं साजरं करत प्राचीन कहाण्यांचे घाट समकालीन संवेदनेशी जोडते. ताज्या, जिवंत भाषेतून मानवी अस्तित्वाच्या गाभ्याला स्पर्श करते. स्मृती आणि परंपरांचे परस्परांशी घट्ट गुंतलेले धागे भाषेच्या उजेडात आणते.
- निखिलेश चित्रे
(out of stock)
MRP ₹399 ₹340 (59₹ Discount)