निबंध , अनुवादित

द नाईव्ह अँड द सेंटीमेंटल नॉव्हेलिस्ट

(The Naive And Sentimental Novelist)

लेखक : ओरहान पामुक

प्रकाशन : पपायरस प्रकाशन

चार्ल्ज़ एलियट नॉर्टन (१८२७ ते १९०८) हे अमेरिकी लेखक, साहित्यिक आणि कलेतिहासाचे प्राध्यापक होते. पुरोगामी आणि उदार विचारवंत म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या स्मृत्यर्थ हार्वर्ड विद्यापीठात नॉर्टन व्याख्यानमाला १९२५ पासून आयोजित केली जाते. प्रत्येक नोबेल विजेत्या साहित्यिकाला आपल्या लेखनप्रक्रियेबाबत चिंतनपर व्याख्यानं देण्यासाठी या व्याख्यानमालेत निमंत्रित केलं जातं. २०१० साली ओरहान यांनी या व्याख्यानमालेत दिलेली ही व्याख्यानं आहेत. यांत आपली कादंबरी वाचनाची आणि लेखनाची प्रक्रिया पामुकने उकलून दाखवली आहे. तसं करताना शिलर या जर्मन विचारवंताने मांडलेल्या नाईव आणि सेंटिमेंटल या कादंबरीकारांच्या प्रवृत्तींच्या द्वैताचा ऊहापोह केला आहे. जर्मन भाषेत या द्वैताची चर्चा करताना शिलरने सेंटिमेंटल हा शब्द चिंतनशील या अर्थाने वापरला आहे. याशिवाय कादंबरीचं वाचन, लेखन, कादंबरीतील वर्णन, वस्तू, पात्र आणि कादंबरीचा गाभा यांची सुरस चर्चा पामुकने या व्याख्यानांमध्ये केली आहे.

(out of stock)

MRP ₹425 ₹360 (65₹ Discount)