
(Albert Elis Vichardarshan)
लेखक : अंजली जोशी
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांनी प्रवर्तित केलेले विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र आपले भावनिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करते. जगभरातील अनेक क्षेत्रांतील व्यक्ती या मानसोपचाराचा यशस्वी वापर करून आपली कार्यक्षमता वाढवत आहेत.
या मानसोपचारपद्धतीच्या इतिहासापासून ते तिची मूलभूत वैशिष्ट्ये व उपचारपद्धती यांची समग्र ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.
माणूस कशासाठी धडपडतो, धडपड आणि तडफड यात फरक काय, तो कशाने दुःखी होतो, स्वतःचे जीवन सुखी व सर्जनशील कसे करू शकतो, यांसारख्या प्रश्नांचा ऊहापोह यात केला आहे. दैनंदिन जीवनातील अनेक भावनिक समस्या वा मानसोपचाराचा वापर करून कशा सोडवाव्यात, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून वाचकांना मिळेल.
तसेच भावनिक अस्वास्थ्याची दीर्घ चिकित्सा पुस्तकात केली असल्यामुळे, हे पुस्तक म्हणजे अभ्यासकांसाठीही पर्वणी आहे.
MRP ₹425 ₹380 (45₹ Discount)