वैचारिक , लेखसंग्रह

उभं आडवं

(Ubha Adava)

लेखक : राहुल कोसंबी

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

'उभं आडवं'मधून राहुल कोसम्बी यांचे विवेचनपर गद्य प्रथमच पुस्तकरूपाने मराठी वाचकांसमोर येते आहे. या ताज्या दमाच्या लेखनातून सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक भानाची ऊर्जा ओसंडून वाहते आहे. भोवती घडणाऱ्या घटितांचे खोलवरचे विश्लेषण हा या लेखनाचा महत्त्वाचा विशेष आहे राहुल कोसम्बी शोषितांच्या प्रत्यक्षातील जगण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि या मूर्त परिस्थितीच्या संपर्कात आपला सैद्धान्तिक व्यूह आणतात. प्रत्यक्ष वास्तव आणि सिद्धान्तव्यूह याची अशा प्रकारे सांगड घातल्यामुळे राहुल कोसम्बो यांचे विवेचन असांकेतिक रीतीने जिवत, व्यामिश्र आणि सामाजिक जीवनाच्या विविध स्तरांवर प्रकाशझोत टाकणारे झाले आहे.

अपारंपरिक आणि निर्भय अशी, स्वच्छ, सुस्पष्ट आणि तडजोडी न करणारी डावी भूमिका 'उभं आडवं'च्या केंद्रस्थानी आहे. ती चुकूनही सोयो, गैरसोयी आणि तडजोडो यांचा विचार करीत नाही यामुळेच राहुल कोसम्बी याच्या लेखनात रोखठोक निर्भीड परखडपणा आलेला आहे शोषण जन्माला घालणाऱ्या परिस्थितीचे आव्हान स्वीकारून इतिहासाने निर्माण केलेल्या कोंडीतून मार्ग काढण्याची कृतिशील जाणिवेच्या पातळीवरील हिमत हे राहुल कोसम्बी याच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे परिमाण आहे.

'उभं आडवं'चा अकादमिक परीघ व्यापक आहे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्याभ्यास अशा विविध ज्ञानशाखाचा खोलवरचा संदर्भ असलेल्या 'उभं आडवं'मधील विवेचनाची नाळ परिवर्तनाच्या चळवळीशी जोडलेली आहे. साहित्यासहचे विविध सांस्कृतिक व्यवहार, जातिव्यवस्था, वर्ण आणि वर्ग यांच्या विशिष्ट संयोजनाने आकाराला आलेली भारतीय समाजरचना, स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पटांवर चाललेले राजकारण, अनेकविध सैद्धान्तिक प्रवृत्ती यासारख्या अनेक गोष्टी राहुल कोसम्बी यांच्या परिवर्तनाच्या परिदृष्टीतून सखोल विश्लेषणाचा विषय होतात.

मराठीतील वैचारिक गद्याच्या क्षेत्रात अलीकडे निर्माण झालेली पोकळी लक्षात घेता राहुल कोसम्बी यांच्या लेखनाकडे आशेने पाहायला हरकत नाही, याची खात्री पटवणारी क्षमता 'उभं आडव'मध्ये निश्चितच आहे.

- हरिश्चंद्र थोरात


MRP ₹475 ₹425 (50₹ Discount)