वैचारिक

आता आमच्या धडावर आमचेच डोके

(Ata Amachya Dhadavar Amchech Doke)

लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे

प्रकाशन : लोकायत प्रकाशन

भारतीय संस्कृतीचा इतिहास घडत असताना वैदिकांनी येथील बहुजन समाजावर अपार अन्याय केलेच. पण तो इतिहास लिहितानाही प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचे वस्तुनिष्ठ वर्णन करण्याऐवजी आपल्या लहरीनुसार व आपल्या हितसंबंधांसाठी आपल्या 'सख्ख्या' पूर्वजांना सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय द्यायचे आणि वाईट गोष्टींचा ठपका इतरांच्या माथी ठेवायचा अशी चलाखी केली. इतिहास लिहिताना न्यायाला अन्याय आणि अन्यायाला न्याय्य ठरवून टाकण्याची किमया त्यांनी केली. स्वतःच्या अत्यंत दुष्ट पूर्वजांनाही सज्जन म्हणून आणि बहुजनसमाजातील अत्यंत सत्प्रवृत्त व सदाचरणी लोकांनाही दुष्ट म्हणून रंगवण्याचे काम त्यांनी केले. खरेतर अशा प्रकारची 'पापे' त्यांनी किती केली, त्यांची गणतीच नाही. म्हणूनच त्यांनी सांगितलेल्या इतिहासाकडे संशयाने पाहणे, ही भारताचा इतिहास नीट समजून घेण्यासाठी असलेली अत्यंत महत्त्वाची अशी पूर्व-अट आहे.

(out of stock)

MRP ₹290 ₹245 (45₹ Discount)