वैचारिक , लेखसंग्रह

केतकर लेखसंग्रह

(Ketkar Lekhsangrah)

लेखक : श्री. व्यं. केतकर

प्रकाशन : साहित्य अकादमी

डॉ. केतकरांना अवघे त्रेपन्न वर्षांचे आयुष्य लाभले, पण तेवढ्यात ज्ञानाच्या अनेक क्षेत्रांत त्यांनी अप्रतिहत संचार केला. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा, वैदिक संशोधन, महाराष्ट्रतिहास, साहित्यशास्त्र, राजकारण वगैरे क्षेत्रांत त्यांनी केलेले लिखाण क्वचित विवाद्य असले तरी एकंदरीने बहुमोल आहे, या विषयी शंका नाही. विशेषतः समाजशास्त्रज्ञ व वैदिक संशोधक म्हणून त्यांनी जी कामगिरी बजावली ती अशा तोलामोलाची झाली की महाराष्ट्राने तिच्याविषयी सदैव अभिमान बाळगावा. त्यांच्या कादंबऱ्या अनेकांना कलादृष्ट्या सदोष वाटल्या असतील, पण त्यांत समाजजीवनाची नि मानवी मनाची जी चित्रे रेखाटली आहेत आणि जीवनविषयक विचारांना जी चालना दिली आहे ती दृष्टीआड करण्यासारखी नाही. या ग्रंथाचे संपादक डॉ. य. दि. फडके यांनी डॉ. केतकरांच्या समग्र लेखनाचे विहंगम-दर्शन या संग्रहाद्वारे घडविले आहे.

(out of stock)

MRP ₹350 ₹280 (70₹ Discount)