लेखसंग्रह , ललित

संस्कृतीसंचित

(Sanskrutisanchit)

लेखक : दुर्गा भागवत

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

लोकसाहित्य, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्मविचार-विशेषतः बौद्ध धर्म, परंपरा या साऱ्या अभ्यासविषयांमधील लेखनाबरोबरीनेच दुर्गाबाईचे ललितलेखन होत गेले आहे. या साऱ्या गंभीर प्रकृतीच्या विषयांचा धांडोळा घेताघेताच मानवी जीवनाबद्दल जे जे जाणवत गेले, ते ते त्या आपल्या लेखनातून मांडत गेल्या. मग कधी त्या लेखनाचे स्वरूप स्वतः जवळील संपादित ज्ञानाचे आकलन व अन्वय असे राहिले, कधी त्या अनुभवाने ललित रूप धारण केले, तर कधी केवळ संकलन करणे हेदेखील त्यांना महत्त्वाचे आणि आवश्यक वाटले मानवी सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ती कितीही क्षुद्र असो वा भव्य असो -त्या गोष्टीला या सृष्टीच्या विराट पसाऱ्यात स्थान आहे आणि मानवी संस्कृतीच्या वाटचालीत या साऱ्यांचा सहभाग आहे हे त्यांनी जाणले होते आणि वेळोवेळी त्यांनी ते आपल्या लेखनातून व्यक्तही केले.

मानवी संस्कृतीची एकात्मता हो आपण सर्वांनी जाणून घ्यायची एक वस्तुस्थिती आहे, ते केवळ स्वप्न वा कल्पना नव्हे. या व्यापक समजुतीतूनच त्या लिहीत गेल्या त्यामुळेच असेल, त्यांच्या मनात आणि म्हणून लेखनात कोणत्याही प्रकारचा धर्म, जाती, देश, परदेश, नागर, अनागर असा भेदभाव आपल्याला दिसत नाही त्यांचे कुतूहल त्यांना सर्वत्र घेऊन जाते आणि आपल्याला माहीत झालेले सर्वांना सांगावे या आत्यंतिक ओढीने त्या सांगत जातात

- प्रस्तावनेतून


MRP ₹390 ₹350 (40₹ Discount)