मूर्तीशास्त्र , शिल्पकला

शिवमूर्तये नम:

(Shivamurtaye Namah)

लेखक : डॉ. गो. बं. देगलूरकर

प्रकाशन : स्नेहल प्रकाशन

भारतात सर्वाधिक प्रमाणात पूजिला जाणारा देव म्हणजे शिवमहादेव. त्याच्या लीला अगाध आहेत. अर्थातच त्यावर आधारलेल्या मूर्तीही अनेक प्रकारच्या आहेत. विष्णूपेक्षा त्याचे क्षेत्र व्यापक आहे कारण तो सर्व जातीजमातींना पूज्य आहे. अन्य दुसऱ्या कोणत्याही देवतेच्या मूर्तीची संख्या कमीच भरेल. वेदातील रुद्र, म्हणजे पुराणातील शिव. समाज प्रबोधन, समाज परिवर्तन या संबंधीच्या अनेक घटना याच्या मूर्तीद्वारे गोचर झाल्या आहेत. श्रीमद् आद्य शंकराचार्य, तसेच अनेक सिद्धान्ताचे प्रणेते, तत्त्वज्ञानाचे उद्‌गाते यांनी याच्या रूपांचा विचार केला, कलाकारांना प्रचोदित केले आणि तरीही याची समग्रपणे, साकल्याने वर्णने परिपूर्ण होत नाहीत असे दिसते. हा दशांगुळे उरतोच. थोडक्यात सांगायचे तर 'न सन्ति याथार्थ्य विदः पिनाकिनः'

असे असले तरी येथे रुद्र, शिवलिंग आणि शिवाच्या सामान्य आणि विशेष प्रकारातील अनेक प्रकारच्या मूर्तीसंबंधी, त्यामागील कथाधार, आणि त्यापैकी काहीतून प्रकट होणारे तत्त्वज्ञान या सर्वांचा सोपपत्तिक विचार मांडलेला आहे. एका परीने शिवमहादेवाचे केलेले हे धर्मकीर्तनच होय.

(out of stock)

MRP ₹275 ₹220 (55₹ Discount)