(Sursundari)
लेखक : डॉ. गो. बं. देगलूरकर
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन
मंदिरावरील सुरसुंदरींवर लिहून डॉ. देगलूरकरांनी मराठी वाङ्मयात फार मोठी भर टाकली आहे; आणि एका नव्या विषयाचा उत्कृष्ट भाषेत ओनामा केला आहे. शिल्पप्रकाश, क्षीरार्णव अशा ग्रंथांतून त्यांची नावे व वर्णने आली. प्रा. देगलूरकरांनी त्या सुरसुंदरींची नावानिशी ओळख पटवली, एवढेच नव्हे, तर मंदिरावरील त्यांच्या शिल्पांकनांचे प्रयोजन काय असू शकेल याचे दिग्दर्शन केले. शुभगमना, दर्पणा, शत्रुमर्दिनी, पद्मगंधा, जया इत्यादी सुरसुंदरी काय सुचवितात, हे त्यांनी सांगितले ते पटावे असेच आहे. महाराष्ट्रातील मंदिरे व मूर्तिकला यासंबंधात एक महत्त्वाच्या व तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या विषयाला हात घालण्याचे मोठे काम प्रा. देगलूरकरांनी केले आहे. महाराष्ट्रातील संतवाङ्मय आणि भक्तिसंप्रदाय या बाबतीत देगलूरकरांच्या घराण्याचे मोठेच योगदान आहे. त्या परंपरेत वैज्ञानिक पुरातत्त्वशास्त्र, मंदिरांचा आणि मूर्तिकलेचा विकास या अंगाने प्रा. गो. बं. देगलूरकरांनी फार महत्त्वाची भर घातली आहे.
-म. न. देशपांडे
भूतपूर्व महानिदेशक भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, भारत सरकार, नवी दिल्ली
(out of stock)
MRP ₹175 ₹145 (30₹ Discount)